Marathi breathless/rap? from My poems on Manogat.com (2006)


गाव पहाटे पहाटे होते शांत झोपलेले,
कुठे दारी नि आकाशी छोटे दिवे पेरलेले,
नाक्याशी उभा मी अन् ते होते खंगलेले,
दोन वृद्धसे शेजारी अन् निखारे फुललेले,
थोड्या वेळाने दिसले चार जण कसलेले,
निघालेले ते बघण्या उद्या पोट भरलेले,
गडी दिसला होता तो डोई टापर बांधले,
नाक्यावरच शेजारी चहा आधण टाकले,
शिराळ गप्पांची जमली जोडी त्यांच्या संग,
गडी घोटाळत होते होते आस्वादात दंग,
गार तळ्यावर वारे रेखी हलके तरंग,
कुणी बेडूक तयाचा करी डराव व भंग,
आता हाकाटी दिली ती कोणी चढत्या आवाजे,
डोळे चोळ्त चोळत पोर उठे धनगराचे,
शेजार पाजार जागवीत बाई पाण्याला निघाल्या,
नाही भीत अंधाराला होत्या खूप सरावलेल्या,
घागर कळशी वाज वाजली खडंग,
कही जणींच्या खांद्याशी बाळे दुपट्यात अंग,
आता गाव जागलेले रात्र कण उरलेले,
तरी नारायण आताशी कांबळ्यात पडलेले,
अरे उठले उठले झाली सकाळ कशीही,
कोंबडराजे नारवीता सारी हळद पिकली,
पाणी दिसते तळ्याचे काळ्या निळ्या ते निऱ्यांचे,
चला राव तुम्ही आता वाट पाहणे कशाचे,
पाय ठेवून पाण्यात उभा शांत मी राहीलो,
निघे तरंग त्यातही ज्यात तुला मी शोधतो.
मंदार

Comments

Popular Posts