रिकाम टेकडी.... (Abhang)

Keep an eye on 8-8-8-6 or 6-6-6-4 (used here) format for every stanza. That is one of the rules for "abhang" 
नसे कोणी माझा
मीही न कुणाचा
विचारही तुझा
करी न मी
विसरून तुला
मोकळा होईन
आनंदे राहीन
एकटा ही
निर्धार हा माझा
कायमचा पण
स्वतःशी हे रण
खेळतो मी
मनी का भिनावे
एकले गोंदण
विरहाची खूण
निघेना ही
नाही शोधणार
तुला आता क्षणी
"मन" असे कोणी
भटकतो
रिकामी टेकडी
रिकामा डोंगर
रिकमा पर्वत
मनामध्ये
- मन ( थकलेले )


मला थकवणारी आजपर्यंत एकच गोष्ट आहे ती म्हणजे एकटे पण..........
आणि हे कुणासाठी आहे हे आज मी आठवण्याचा प्रयत्न केला .........

कोणी दिसेना हो..........

फक्त धुरकट
दिसलेसे काही,
बाकी सारे वाही,
गालां वर

घरकुल माझे
राहे दूरवर
क्षितिज ज्यावर
एक टिंब

चालतो मी वाट
संगे कुणी नाही
स्वर्ग असा काही
मज भावे...........

एकला मी आज
एकला प्रवास
थकलेला श्वास
म्हणूनसे      

- मन ( काय म्हणू?)


युद्ध हे चालते
अवचित नाही
अशीही लढाई
नेहमीची

असे मीच योद्धा
धरणीही मीच
धारातीर्थी तेच
मन असे

असे काही रक्त
सांडते जे तेव्हा
मन माझे जेव्हा
जिंकतसे

अणि सारे काही
जसे तसे होई
जेव्हा कोणी येई
आपलासा

आपला_प्रवासी
सारे बघतसे
आठवतो जसे
अंतर्योद्धा...........
- मन


एकटा
...
अरे वेड्या मना
नाहीस एकटा
भाऊ तू धाकटा
आहेस रे
वळोनिया बघ
पुसुनिया डोळे
मनोगती बाळे
रांगतात
घराची ती ओढ
कुणा वेड्या नाही
बघ दिशा दाही
फिरूनिया
युद्धही थांबते
तह करता ते
मनाशी मनांते
आपसुक
प्रवासात मना
चंद्र सूर्य तारे
असतात सारे
एकटेच
दुःखाचे उसासे
वादळ नसती
योद्धे ना हरती
कणखर
घेतलास ठाव
तू जर मनाचा
डोंगर सुखाचा
चढशील
-नीलहंस.



Comments

Popular Posts