Manogat.com वर मन या नावाने मी थोडेफार लेखन केले त्यातला हा माझा पहिला वाहिला गझल लिहिण्याचा प्रयत्न

नव्याने पुन्हा...

असे शब्द घुमले पुन्हा ते नव्याने..
मना अर्थ कळतो ..नव्याने पुन्हा...

वाटा पुन्हा त्याच पायी जरीही..
गमे स्पर्श मज तो.. नव्याने पुन्हा...

जरी खेळ वाटे अता संपलेला.. 
मुठी आज वळतो.. नव्याने पुन्हा...

जरी आज सुटती उसासे कुणाचे..
नवा श्वास भरतो ..नव्याने पुन्हा...

असे पान सुकले उन्हाने वनाचे..
उभा वृक्ष फुलतो ..नव्याने पुन्हा...

जरी अत्तराची कुपी सांडलेली..
तिचा गंध उठतो.. नव्याने पुन्हा

जरी पावसाने असे काव्य पुसले..
नवे काव्य रचतो.. नव्याने पुन्हा..

असे शब्द घुमती ..पुन्हा ते नव्याने..
अता सूर जमतो ..नव्याने पुन्हा...

               ( नव्या जोमाने ) मन

Comments

Popular Posts