कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे- from Manogat.com my old creations PART 1


कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
स्वतःच्या परी रंग अपुले उठावे
जरी "स्व"त्व गेले कुणा न कळावे
बिलगून तू इन्द्रचापी बनावे
जनी स्वर्ग बांधी स्वतःच्या विचारे
कुणी स्वर्ग माने स्मितारे तुझ्या रे
हसूनी जगावे कुणा हासवावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
रे मित्र हे चित्र अद्यूरे बिना रे
तुझियाच साठी "लिहिणे" पुन्हा रे
तुमचेच तारे मम मनोगता रे
तुम्ही रंग व्हावे तुम्ही रंगवावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे----
शक्य आहे... हा लहान तोंडी मोठा घास मी घेतला असेल...
पण कृपा करून भास्कर काका आणि समस्त मनोगतींनी
पुन्हा एकत्र यावे.......
या समस्या पूर्तीतून या समस्येचीही पूर्ती लवकरात लवकर व्हावी.....
समस्यापूर्तीच्या विषयासाठी ओंकार यांचे आभार..........चूकभूल माफ़ असावी
मन

Comments

Popular Posts