उत्तर from manogat.com year (2006)

गाईला तू चारा दे, पंथस्थाला वारा दे ,
अवसेच्या त्या कृष्ण रात्रिला शुक्राचा तू तारा दे ,
पण आई... पण आई... या फडफडणाऱ्या पिल्लाला तू,
घरट्यामध्ये थारा दे..........फक्त घरट्यामध्ये थारा दे
छिल्लीला तू कातळ दे , गारांना तू वादळ दे ,
पण थकलेल्या या नयनांना तु प्रशांत अंजन काजळ दे ,
झाडांना तू पाणी दे , सुरावटींना गाणी दे ,
पण भुकेजलेल्या या पोटाला दोन घास ती भाकर दे
थंडीमध्ये शेक दे , पावसातले छप्पर दे ,
मस्तकातल्या तडितेला , या हृदयातल्या विवंचनेला
थकलेल्या या गणगोत्राला विसावण्यासी पदर दे
घरट्यात तुझ्या थारा........मला ,.........जमलंच तर उत्तर दे

Comments

Popular Posts