Skip to main content

Posts

Featured

तिही तारका जाई विझुनी

रात्र एकटी... प्रवास सुंदर... लुकलुकणाऱ्या गवतामधुनी , नाजुक वेडी.... शुक्र तारका... उठुन दिसे जी साऱ्यामधुनी, भाव विलोभी... पूर्ण पौर्णिमा... चंद्र तिचा तो येता गगनी , श्याम सुंदरा... पाहुनी राधा... तशी तारका येई खुलुनी , शुभ्र पिसारा... दुधाळ रस्ता... शुभ्र चांदणे झेले अवनी , निघे भेटण्या... चंद्र मनोहर... तिला पाहता तमात गगनी, प्रहरा मागुन.. प्रहर लोटतो.... प्रेम दाटता विकल मनी , झोंबतात मग.. अजुनी वारे.... रात्र बहरते तरुणाईतुनी , धुके दाटता... शोधु कशी रे... अश्रु हळहळे डोळे झरुनी , तुझ्याच साठी.. निघे प्रिये मी... अंतर जरिही उरते पुरुनी , असाच अश्रू... रात्र लोटते... दिसे थेंब जो गवतामधुनी , दवात हरवे... चंद्र तोचि अन्... तिही तारका जाई विझुनी . ( हरवलेले )- मन

Latest Posts

The Cello Song

Decisions..

जलजला (Earth-quake)

Thinking of you, when the stars go blue.. उलझा रहा हूँ

मशाल

A Golden Cage

Never giving up..

Texan Rain and me

What makes us creative!

Humbled: A chat log.