कविता क्र ८ - मरता येत नाही म्हणून ! Story of a 16yr/F With Quadriparesis.
कविता क्र ८ - मरता येत नाही म्हणून !
पार्श्वभूमी...
वॉर्ड ४ ... बिछाना ७ वा...
रुग्ण - संजीवनी वरदे वय - १६ वर्षे
रोगनिदान- traumatic quadriparesis( मानेवर मार
लागून हात आणि पायातील ताकद संपली आहे)
अशीच एक ओळ असते जी वाचून जरा विचित्र वाटते,
का हो? मरता येत नाही म्हणूनच का जगायचे असते?
"ती" एक खोली असते; "तिच्या" मनातली जखम ओली असते,
खोलीत एक झाड असते , झाडालाही एक वाढ असते;
"तिलाही" एक जागा अस्ते, जिच्यात ती वाढत असते;
म्हटलं तर ती एक फूल अहे, म्हटलं तर पळण्यातलं मूल अहे;
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तिच्या पायात पैंजण नसतात;
कारणच असे काही असते, तिचे धड असूनही नसते.
उमलत्या फुलाला झाली अशी काही शिक्षा असते;
अक्षरे लिहिण्याइतपत हातामध्ये भिक्षा असते,
ती कधी हसत नसते, मनाचे बुरुज सांभाळत नसते,
जमलंच तर त्यांना आदराने चितारत असते,
अपूर्ण उरल्या चित्रांना डोळेभरून पाहत असते,
अशी तिची ती "डायरी" असते
तिच्या पहिल्याच पानावर एका प्रश्नाचे उत्तर असते;
जगायचे असते.... ?? का .. का .. जगायचे असते..??
फक्त मरता येत नाही म्हणून......................
- मन ( उत्तराच्या शोधात )
(दारूच्या नशेत वडिलांनी मारलेल्या दांडक्याचा मार लागून ही मुलगी स्वतःच्या आयुष्यातील आनंद गमवून बसली आहे...)

Comments