कविता क्र ७ - अंतयोद्धा (संभाषण.. मनाचे मनोगत )

नसे मी माझा
मी ही ना कुणाचा
विचारही तुझा
करीन मी ( करी "न" मी)

विसरून तुला,
मोकळा होईन
आनंदे रहीन, 
एकटाही (एक टाही)

निर्धार हा माझा
कायमचा पण
स्वतःशी हे रण
खेळतो मी ("खेळ" तो "मी")

नाही शोधणार
तुला आता क्षणी
"मन" असा कोणी
भटकतो

रिकमी टेकडी
रिकामा डोंगर
रिकामा पर्वत
मना माजी !

- मन (थकलेले)

माझ्या मनातले बघण्याचा प्रयत्न केला.. पण व्यर्थ..!

फक्त धुरकट
दिसलेसे काही
बाकी सर्व वाही
गालांवर

घरकूल माझे
राहे दूरवर
क्षितिज ज्यावर
एक टिंब

चालतो मी वाट
संगे कुणी नाही
स्वर्ग माझा कोठे
हरवला

एकला मी आज
एकटा प्रवास
थकलेला श्वास
म्हणू नसे (म्हणून असे)

- मन ( काय म्हणू)

कुणी प्रवासी आले अणी माझ्या बरोबर बोलले. त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा दिसल्या.. त्यांनी माझ्यात एक अंतर्योद्धा बघितला... त्यांना दिलेले उत्तर..!

युद्ध हे चालले
अवचित नाही
आत ही लढाई
नेहमीची

असे मीच योद्धा
धरणी ही मीच
धरतीर्थी हेच
"मन"असे

असे काही रक्त
सांडतसे जेव्हा
मन माझे तरी
जिंकतसे

आणि सारे काही
जसे तसे होई
जेव्हा कोणी बोले
आपलासा

आपला प्रवासी
सारे बघतसे
आठवतो जणू
अंतर्योद्धा

- मन (धरातीर्थी)

Comments

Popular Posts