कविता क्र ६ - ०२/२००५ - कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे ...
कविता क्र ६ - ०२/२००५ - कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे ...
(समस्यापूर्ती)
रे मित्र,
कुणा ठाव रे जन्म कैसाचि झाला
कसा जीव रे रंग बेरंग झाला
का खेळ व्हावे कुणा खेळवावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
धवलाकडे रंग सप्ती असावे
जरी रंग बेरंग तरिही उरावे
अस्तित्व म्हणजे मलाही कळावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
असे जीव रे रंग मन्मंदिरीचा
नसे रंग रे रंगरंगावलीचा
कधी रेख व्हावे कधी विस्कटावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
कुणी मुक्त वायू सवेही वहातो
कुणी क्रुद्ध वाऱ्यावरी स्वार होतो
उडूनी सुटावे सुटूनी उडावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
कुणाला न ठावे स्व अंतास जाणे
करी तो बहाणे वळूनी पहाणे
जगूनी मरावे मरूनी उरावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
- मन
(समस्यापूर्ती)
रे मित्र,
कुणा ठाव रे जन्म कैसाचि झाला
कसा जीव रे रंग बेरंग झाला
का खेळ व्हावे कुणा खेळवावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
धवलाकडे रंग सप्ती असावे
जरी रंग बेरंग तरिही उरावे
अस्तित्व म्हणजे मलाही कळावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
असे जीव रे रंग मन्मंदिरीचा
नसे रंग रे रंगरंगावलीचा
कधी रेख व्हावे कधी विस्कटावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
कुणी मुक्त वायू सवेही वहातो
कुणी क्रुद्ध वाऱ्यावरी स्वार होतो
उडूनी सुटावे सुटूनी उडावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
कुणाला न ठावे स्व अंतास जाणे
करी तो बहाणे वळूनी पहाणे
जगूनी मरावे मरूनी उरावे
कुणी रंग व्हावे कुणी रंगवावे
- मन
Comments