तिही तारका जाई विझुनी


रात्र एकटी... प्रवास सुंदर... लुकलुकणाऱ्या गवतामधुनी ,
नाजुक वेडी.... शुक्र तारका... उठुन दिसे जी साऱ्यामधुनी,
भाव विलोभी... पूर्ण पौर्णिमा... चंद्र तिचा तो येता गगनी ,
श्याम सुंदरा... पाहुनी राधा... तशी तारका येई खुलुनी ,
शुभ्र पिसारा... दुधाळ रस्ता... शुभ्र चांदणे झेले अवनी ,
निघे भेटण्या... चंद्र मनोहर... तिला पाहता तमात गगनी,
प्रहरा मागुन.. प्रहर लोटतो.... प्रेम दाटता विकल मनी ,
झोंबतात मग.. अजुनी वारे.... रात्र बहरते तरुणाईतुनी ,
धुके दाटता... शोधु कशी रे... अश्रु हळहळे डोळे झरुनी ,
तुझ्याच साठी.. निघे प्रिये मी... अंतर जरिही उरते पुरुनी ,
असाच अश्रू... रात्र लोटते... दिसे थेंब जो गवतामधुनी ,
दवात हरवे... चंद्र तोचि अन्... तिही तारका जाई विझुनी .
( हरवलेले )- मन

Comments

Anonymous said…
No you do not have "extraordinary grit".

Popular Posts