कविता क्र १ - १०/२००२ -"शोध"

गाव पहाटे पहाटे होते शांत झोपलेले,
कुठे दारी नि आकाशी होते दिवे पेरलेले..

नाक्याशी उभा मी अन ते होते खंगलेले,
दोन व्रुद्धसे शेजारी अन निखारे फुललेले..

थोड्या वेळाने दिसले चार जण कसलेले,
निघालेले ते बघण्या उद्या पोट भरलेले..

गडी दिसला होता जो डोई टापर बांधले,
नाक्यावरच शेजारी चहा आधंण टाकले..

शिराळगपांची जमली होती जोडी त्यांच्या संग,
गडी घोटाळत होते.. होते आस्वादात दंग..

गार तळ्यावर वारे रेखी हलके तरंग,
कधी बेडूक तयाचा करी डराव-व-भंग..

आता हाकाटी दिली ती कोणी चढत्या आवाजे,
डोळे चोळत चोळत पोर उठे धनगराचे..

घागर कळशी नळाशी वाज-वाजली खडंग,
कही जणींच्या खांद्याशी बाळे.. त्यांचे दुपट्यात अंग..

आता गाव जागलेले, रात्र कण उरलेले,
तरी नारायण आताशी कांबळ्यात पडलेले..

अरे उठले उठले झाले सकाळ अशी ही,
अहो म्हणता म्हणता सारी हळद पिकली..

पाणी दिसते तळ्याचे निळ्या काळ्या या निऱ्यांचे,
चला राव तुम्ही आता वाट पाहणे कशाचे..

पाय ठेवून पाण्यात उभा शांत मी राहिलो,
निघे तरंग त्यातही ज्यात तुला मी शोधतो..

                                    -मन

Comments

Anonymous said…
Gr8 one Sir. Kaustubh

Popular Posts