कविता क्र ३ - ११/२००२ - खुणाच होत्या त्या पाऊलखुणा...

खुणाच होत्या त्या पाऊलखुणा..


रानातल्या चाफ्यामध्ये खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'दवबिंदूंच्या' ;

पानातल्या खाचांमध्ये खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'नव कलिकांच्या' ;

डोंगरा आडच्या वाटांवर खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'मुग्ध सरींच्या' ;

चुलीखालच्या दगडांमध्ये खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'लुप्त धगीच्या' ;

पाण्यावरच्या लहरींमध्ये खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'त्यक्त निर्माल्याच्या' ;

देवळाच्या गाभार्यामध्ये खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'विट्ठल रखुमाईच्या' ;

शेतामधल्या वडाभोवती खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'लक्ष साकड्यांच्या' ;

मनामधल्या वादळामध्ये खुणाच होत्या , पाऊलखुणा त्या 'मैत्रीच्या' ...

Comments

Popular Posts