कविता क्र 2 - १०/२००२ -"शोध" सायंकाळ
सारे काही शांत आता गाव थकलेले,
होते तुळशी वृंदापाशी तेजदीप तेवलेले..
डोळे त्यांचे बंद, इवले हात जोडलेले,
'शुभंकरोती कल्याणं.. ' चे बोल घुमलेले..
नाक्याशी टेकूनी कही लोक बसलेले,
डोळे सारे ते निराश अन अंग उललेले..
देवाची पायरी.. तेथे व्रुद्ध टेकलेले,
मोजून तयांनी होते पैसे ठेवलेले..
गडी निघाले घराला त्यांचे डोळे भरलेले,
आज पोरांच्या नशीबी काही गोड दिसलेले..
पाणी तसेच तळ्याचे होते शांत थांबलेले,
त्याच्याही उराशी तृण काटे रुतलेले..
ब्रह्म कमळ कुठे रे? ते देठ उरलेले,
कुणी पोट भरते.. त्याने आयू वेचलेले..
क्षितिज किनारी.. काळे लाल उरलेले,
खग आले खग गेले.. भिरभिरलेले..
मी होतो अविचल.. माझे मन ओथंबले..
असे दूर वर कुणी दिसलेले कुणी हसलेले
- मन
होते तुळशी वृंदापाशी तेजदीप तेवलेले..
डोळे त्यांचे बंद, इवले हात जोडलेले,
'शुभंकरोती कल्याणं.. ' चे बोल घुमलेले..
नाक्याशी टेकूनी कही लोक बसलेले,
डोळे सारे ते निराश अन अंग उललेले..
देवाची पायरी.. तेथे व्रुद्ध टेकलेले,
मोजून तयांनी होते पैसे ठेवलेले..
गडी निघाले घराला त्यांचे डोळे भरलेले,
आज पोरांच्या नशीबी काही गोड दिसलेले..
पाणी तसेच तळ्याचे होते शांत थांबलेले,
त्याच्याही उराशी तृण काटे रुतलेले..
ब्रह्म कमळ कुठे रे? ते देठ उरलेले,
कुणी पोट भरते.. त्याने आयू वेचलेले..
क्षितिज किनारी.. काळे लाल उरलेले,
खग आले खग गेले.. भिरभिरलेले..
मी होतो अविचल.. माझे मन ओथंबले..
असे दूर वर कुणी दिसलेले कुणी हसलेले
- मन
Comments