आता खूप दिवस झाले आवंढा गिळून अन हुंदका दाबून.. आज एकटे असून रडता आलं नाही
पंखांवरचे पाश आज सुटले कितीक वर्षातून.. आज उडू म्हटले पण उडता आलं नाही
मी वाहता , किनारे माझे , बांध माझा, मागे जलसंचय साचे.. ज्याला सरावे वाटूनही सरता आले नाही
रिते करावे तुझिया पुढती किती वाटे .. काय करू.. माझा विश्वास नावाच्या गोष्टीवरती विश्वासच उरला नाही..
बोलणे जमले नाही
बोलणे जमले नाही
-मन
Comments