डोळ्यात तारकांचे....(this one is latest)

जाहले जड़ ओझे .. डोळ्यात तारकांचे ..
आकाश फक्त उरले , डोळ्यात तारकांचे ..

जणू आर्द्र पापण्या मिटाता , हा वर्ण कृष्ण भासे ..
सल हाय हाय लपले, डोळ्यात  तारकांचे ..:

का शाप प्राप्त झाला, उश्शाप व्यर्थ आहे ...
चमकून अस्त होणे,  डोळ्यात तारकांचे..:

कोणी "मना"स म्हटले ,जे जे मनात आले ..
अस्तित्व आज सलते, डोळ्यात तारकांचे ...

आणि स्वतंत्र उरतो, हां चंद्र आज वेड़ा .. 
आकाश अंथरावे, डोळ्यात तारकांचे...

नाही कुणीच ज्याला हितगूज हे  कळावे...
हास्यात पूर ओले, डोळ्यात तारकांचे...


                                          -मन 

Comments

Popular Posts