कळत नाहीं.. त्रास होतो पण का कळत नाही ..this one is a bit older

उन्हं अंथरता जातो वेळ, कधी कसा कळत नाही,
सावल्या पंघरता वेळ... नाहीं , कधीही कसाही जात नाहीं...

थांबे केव्हा लपतो रस्ता, वळणावरती  कळत नाहीं...
ओढ़ घराची मनी लागता.. दूर दूर हा संपत नाही..

पंखाखाली  जगणा-यांना, ऊन सावली छळत नाही,
कितीक पाने गळुन उडाली , पानझडीला कळत नाहीं..

पळता पळता थकलो मी गे , पाय  उगी हे मळत नाहीं,
ह्रुदयीच्या कण कणात उरते , असे काय ते कळत नाहीं...

मी मग उरतो ऊन-केवडा, आडोश्याला जागा नाहीं,
गंध मनी मी जपतो आहे, हळहळ तुजला कळत नाहीं,

कूस बदलुनी गच्च मिटावे, विचार तरीही टळत नाहीं,
डोळे उघडे पडून रहावे, काय म्हणावे कळत नाहीं ..



                                                  -  कालदीप (मन)

Comments

Unknown said…
Chhan ahe hi kavita!

Popular Posts